रायपूर आरोग्य केंद्रांतर्गत क्षयरोग, कुष्ठरोग शोध मोहीम! ६ डिसेंबर पर्यंत चालणार माहीम..!!
Updated: Nov 21, 2023, 13:31 IST
रायपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूर अंतर्गत क्षयरोग व कुष्टरोग शोध मोहीमेचा शुभारंभ काल २० नोव्हेंबर ,सोमवार रोजी करण्यात आली. सदर मोहीम ६ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे. दरम्यान परिसरातील घरोघरी जाऊन तपासणी सुरू करण्यात आली आहे.
शोध मोहीम अभियानात ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन डॉ शेख उस्मान यांनी केले आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांसह परिसरातील ३२ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. कुष्ठरोग क्षयरोग शोध मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य पर्यवेक्षक एस.जाधव, आरोग्य सेवक प्रदीप मेथे, तानाजी चव्हाण, दीपक देगलुरकर, आय जी राठोड, दिलीप जुमडे, वर्षा गवई,प्रतिभा डुकरे, अर्चना डोंगरे, संगीता पवार, कमल ठाकरे, अर्चना इंगळे, रूपाली भोसले, भीमा आराख, कांचन कानडजे, यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.