लोणारच्या तहसीलदारांची बदली! आता गिरीश जोशी नवे कारभारी

लोणारचे तहसीलदार म्हणून काम सांभाळत असतांना सैपन बाबुलाल नदाफ यांचा कार्यकाळ चांगलाच गाजला. रेती माफियांवर काही प्रमाणात त्यांनी अंकुश ठेवला असला तरी त्यांच्या सोयीच्या लोकांचे रेतीचे धंदे मात्र सुरूच होते असा आरोपही होत होता. सैपन नदाफ आता उत्तर सोलापूर चे तहसीलदार म्हणून काम सांभाळणार आहेत. त्यांची जागी यवतमाळ जिल्ह्यातील झरी - जामणी येथे तहसीलदार म्हणून काम सांभाळले गिरीश जोशी येणार आहेत. गिरीश जोशी यांच्यापुढे काम करतांना अनेक आव्हाने असणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणतील तसे काम करायची पद्धत लोणारच्या आतापर्यंतच्या अनेक तहसीलदारांनी अवलंबली. आता नवे तहसीलदार गिरीश जोशी स्वतःचे वेगळेपण सिद्ध करतात का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी व्ही. डी. पाटील यांचीसुद्धा बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर आता कु. निकिता जावरकर अमरावती येथून येत आहेत.