उपजिल्हाधिकारी दिनेश गितेंची बदली! मेहकरला उपविभागीय अधिकारी म्हणून जाणार; बुलडाणा उपविभागीय अधिकारी म्हणून मूळच्या हातणीच्या राजेंद्र जाधवांकडे जबाबदारी! खामगावातही नव्या अधिकाऱ्याकडे जबाबदारी..!

 
Hdjdnd
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकाभिमुख प्रशासकीय सेवेमुळे जिल्हाभरात सामान्यांना परिचित असणाऱ्या निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांची बदली झाली आहे. श्री गीते यापुढे मेहकरचे उपविभागीय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत तर बुलडाण्याच्या उपविभागीय अधिकारी पदी राजेंद्र जाधव यांना जबाबदारी देण्यात आली आहे. श्री  जाधव यांनी वर्षभरापूर्वी प्रभारी म्हणून बुलडाणा उपविभागाचा गाडा सांभाळलेला आहे.

काल,१२ जूनच्या रात्री उशिरा राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्यशासनाच्या वतीने करण्यात आल्या. यात बुलडाणा जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांची मेहकर ला उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.  बुलडाणा उपविभागीय अधिकारी म्हणून राजेंद्र जाधव मुंबईवरून येत आहे. श्री जाधव यांच्याकडे याआधी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक म्हणून जबाबदारी होती. जाधव यांनी याआधी जिल्ह्यात देऊळगावराजा , खामगाव येथेही कर्तव्य बजावले आहे. राजेंद्र जाधव मूळचे चिखली तालुक्यातील हातणी येथील रहिवासी आहेत. दुसरीकडे खामगाव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बाळापूरचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी कारभार सांभाळणार आहेत.