ट्रॅक्टर चालकांनो सावधान! विहिरीजवळ जरा जपून; घाटनांद्रा येथे वाचा काय घडल..

 
Kskjd
मेहकर( अनिल मंजूळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या शेतकऱ्याचा नांगरणीचा सीजन सुरू आहे. आता बैलांची संख्या कमी झाल्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जवळपास १०० टक्के आहे. मात्र विहीर असलेल्या शेतात ट्रॅक्टर चालकांनी जरा जपूनच ट्रॅक्टर चालविण्याची गरज आहे. जिल्ह्यात याआधी ट्रॅक्टर विहीर पडल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना झाली आहे, दरम्यान आज मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथे तशी घटना होता होता वाचली..
घाटनांद्रा येथील शंकर सोळंकी यांच्या शेतात ही घटना घडली. ट्रॅक्टर चालक पंकज पुंडलिक देशमुख नांगरणी करीत होते. बांधावरील विहिरीजवळून वळण घेतांना ट्रॅक्टरचे समोरचे दोन्ही चाके विहिरीच्या आतील बाजूस कड्यात अडकली. ट्रॅक्टर विहिरीत पलटणार तेवढ्यात प्रसंगावधान राखून चालक देशमुख यांनी नांगराचा फाळ जमिनीत फसवला, त्यामुळे ट्रॅक्टर जागेवर थांबले, त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर काढण्यात आले.