तोरणा महिला अर्बनची आठवी आमसभा संपन्न! आमदार श्वेताताई म्हणाल्या, तोरणा महिला अर्बनच्या सक्षमीकणासाठी सर्वतोपरी योगदान देणार!

तोरणा महिला अर्बनच्या प्रगतीचा आलेख चढताच; बातमीत वाचा संस्थेने कशी प्रगती केली...
 
hgh
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थापनेपासून गेल्या आठ वर्षात तोरणा महिला पतसंस्थेने आपल्या सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी भरीव प्रयत्न केले, येणाऱ्या काळात देखील ही संस्था चिखली व बुलढाणा तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी योगदान देईल अशी  ग्वाही तोरणा महिला अर्बन सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षा आ.  श्वेताताई महाले यांनी दिली. संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल मीरा सेलिब्रेशन येथे  दि. ३० सप्टेंबर रोजी पार पडली. या सभेच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. 
 

gjj

या प्रसंगी मंचावर संस्थेचे मार्गदर्शक विद्याधर महाले, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडितराव देशमुख, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रेमराज भाला, देविदास पाटील धाड, सुनील वायाळ, , पतसंस्थेच्या उपाध्यक्षा पुष्पालता  महाले,  सचिव श्रध्दा  महाले, मीनाताई  पाटील, रेखाताई  पाटील,  स्मिता मापारी,  पुजा  पाटील, अर्चना  महाले, सरीता  कवडकार,  लता  खरे  संगीता कळोदे, रमाकांत महाले, अनमोल ढोरे, समाधान कणखर, पंजाबराव धनवे, राजू जवंजाळ, भगवानराव खरात, गुलाबराव मोरे, कृष्णकुमार सपकाळ, महेश लोणकर, सचिन कोकाटे, हरिभाऊ परिहार, एड. संजय सदार आदी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव व संस्थेचे मार्गदर्शक विद्याधर महाले यांनी देखील आपल्या भाषणातून तोरणा महिला अर्बन पतसंस्थेच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. 

देशाच्या अर्थव्यवस्थेत सहकारी पतसंस्थांचे योगदान महत्त्वाचे - आ. महाले

कोणताही देशाची आर्थिक क्षमता ही त्या देशाच्या आर्थिक परिस्थीतीवर अवलंबून असते. भारतीय अर्थव्यवस्था ही मागील दहा वर्षात दहाव्या स्थानावरून जगातील पाचव्या मजबूत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे. यामध्ये सहकार क्षेत्रातील क्रेडीट सोसायटीचे देखील थोडे का होईना मोलाचे योगदान आहे. याचा आम्हाला “ Being A Co-Operative " नक्कीच अभिमान वाटतो असे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी बोलताना केले. पतसंस्थेच्या स्थापनेपासून आपल्या संस्थेस ऑडीट वर्ग 'अ' मिळाला आहे या साठी सभासद, संचालक मंडळ व कर्मचारी या सर्वाचे त्यांनी  अभिनंदनास केले.

  संस्थेची आर्थिक प्रगती

तोरणा महिला अर्बन सहकारी पतसंस्थेचे  सभासद व वसुल भाग भांडवल तसेच राखीय व इतर निधी गुंतवणूक : नियमित सभासदांमध्ये ९२० सभासदांची वाढ होऊन नियमित सभासद संख्या ९४६९ एवढी झालेली आहे. भाग भांडवलात रु. २८.५३ लाखची वाढ होऊन ३१ मार्च २०२३ रोजी वसुल भाग भांडवल रु.१६६.५९ लाख एवढे झालेले आहे. तसेच राखीव व इतर निधीमध्ये रु. ४५.४४ लाखांनी वाढ झाली असून अहवाल वर्ष अखेर राखीव व इतर निधी रु.२६८.९६ लाख एवढा झालेला आहे. तसेच बँकामध्ये ठेवीच्या रुपाने गुंतविलेल्या रकमेत सुध्दा रु. ९८८.७० लाखांनी वाढ होऊन ती रु. २८४४.१० लाख एवढी झालेली आहे.

 ठेवींचे उद्दिष्ट ओलांडून मारली मोठी मजल

             मागील वर्षीच्या अंदाज पत्रकात दाखविलेले रु २० कोटी ठेवीचे लक्ष पूर्ण झाले असून ३१ मार्च २०२३ रोजी संस्थेच्या एकूण ठेवी रु ७१ कोटी रु०८ लाख एवढ्या झालेल्या आहेत. वरील लक्षापेक्षा रु १८ कोटी रु ७४ लाखाच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. मागील वर्षी संस्थेच्या ठेवी रु. ५२ कोटी रु ३४ लाख एवढ्या होत्या. दरवर्षी ठेवीमध्ये होणारी वाढ ही संस्थेवर असलेल्या दृढ विश्वासाचे घोतक आहे. तसेच तळागळातील गोरगरीब लोकांना व सर्व सर्वसामान्यांना बचतीची सवय लावण्याचे संस्थेचे प्रयत्न सतत चालूच राहणार आहेत. प्रत्येक कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीने योग्य त्या ठेव योजनेत सहभागी व्हावे असे आम्ही अवाहन करतो. त्यावरुन संस्थेची नेत्रदिपक प्रगती असल्याचे ठळकपणे  दिसून येते.

   वर्षभरात ४६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप 

             अहवाल वर्षात संस्थेचे एकूण कर्जवाटप रु ४६ कोटी ४० लाख एवढे झाले असून अंदाजपत्रकातील लक्ष गाठण्यात संस्थेला यश मिळाले आहे. ठेवी वाढीच्या तुलनेत कर्जवाटप कमीच असले तरी कर्ज व व्याजाची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत समाधानकारक झाली. त्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढले. तरीही थकीत कर्जाचा व व्याजाचा भरणा संबंधीत कर्जदार सभासदांनी विनाविलंब करून आपले खाते नियमीत करावे. थकीत कर्जदार सभासदाविरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ नुसार सहकारी कोर्टात तसेच निगोशियेबल इंस्ट्रुमेंट ऍक्ट कलम १३८ नुसार फौजदारी न्यायालयात कारवाई वेगाने चालू आहे. त्यामधील काही केसेस निल झाल्या असून काही केसेसमध्ये वसुलीची प्रक्रीया चालू आहे. अहवाल वर्षात २१ नविन केसाचे वसुलीचे दाखले मिळाले.  वसुलीच्या पुढील कारवाईसाठी वसुली अधिकारी जिल्हा पतसंस्था फेडरेशन बुलडाणा यांचेकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. पुढची कटू कारवाई टाळण्यासाठी संबंधित कर्जदार सभासदांनी लवकरात लवकर थकीत कर्ज व व्याजाचा भरणा करावा आणखी नविन थकीत कर्जदार सभासदांविरुध्द चेक बाउंसच्या कलम १३८ च्या केसेसची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी अशा सभासदांनी हे जरूर लक्षात ठेवावे की, फौजदारी केसेसमध्ये कायद्यानुसार दंड व सक्त मजूरीची तरतुद आहे. ज्या सभासदांवर सक्तीची वसुलीची कारवाई झालेली आहे. त्यांनी भविष्यात संस्थेकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करु नये. त्यात त्यांचेच नुकसान होईल. या बाबींची अवश्य जाण ठेवावी. वसुलीचा दाखला प्राप्त झाल्यानंतर कर्जाची परतफेड व व्याजाचा संपूर्ण भरणा करण्याशिवाय कर्जदार सभासदाला दुसरा पर्याय उपलब्ध नसतो याची सर्व सभासदांनी कृपया नोंद घ्यावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. 
             

 संस्थेचे   सरव्यवस्थापक रवी पाटील, चित्तरंजन गायकवाड, सचिन नागरे, पवन मछले, नंदकिशोर पांचाळ, मदन कोल्हे, गोपाल गुंड, गजानन वानखेडे, उमेष बुंधे, ओम टेकाळे आकोटकर, प्रवीण चव्हाण , प्रशांत वानखेडे, निलेश चौथे, तसेच ज्योती काशीकर , रेणुका म्हस्के , व सर्व शाखावरील कर्मचारी वर्ग उपस्तीत होते. संस्थेचे सन  २०२२ - २३ या आर्थिक वर्षाचे अहवाल वाचन विभागीय व्यवस्थापक  रेठेकर यांनी केले.  सूत्रसंचालन श्याम  वाकदकर  यांनी केले तर व्यवस्थापक अमोल सावळे यांनी  आभार मानले. आमसभेसाठी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.