आज बुलढाण्यात नारीशक्तीचा महौल!महिलांसाठी " न्यू होम मिनिस्टर.. खेळ पैठणीचा" कार्यक्रम!

राजश्री शाहू मल्टीस्टेट तथा धनिक ॲडव्हायझर्स चे आयोजन! गप्पा-गोष्टी, रंजक खेळ, गाणी , धम्माल मज्जा आणि बरचं काही..
 
Jdjf
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गतवर्षाप्रमाणे यंदाही धनिक ॲडव्हायझर्स तसेच शाहू मल्टीस्टेट परिवाराच्या वतीने खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी ६ वाजता बुलडाण्यातील शारदा ज्ञानपीठचे प्रांगणात महिलांसाठी हा आनंददायी कार्यक्रम होणार आहे. 

 संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला हा कार्यक्रम खास महिलांसाठी असतो. सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत "न्यू होम मिनिस्टर" या कार्यक्रमात, पैठणीचा खेळ रंगतदार असतो. गप्पागोष्टी, रंजक खेळ, तसेच हिंदी मराठी गाणी यातून महिलांच्या आनंदाला उधाण येतो. मागील वर्षी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तमाम बुलडाणेकर महिलांचा उदंड प्रतिसाद लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे शाहू मल्टीस्टेट परिवाराच्या अध्यक्षा मालती शेळके यांनी संगितले. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलांसाठी आरोग्यदायी भेट मिळणार आहे. महिलांना निशुल्कपणे या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. हे विशेष, पैठणीच्या खेळातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. त्यामध्ये फ्रिज ,वॉशिंग मशीन ,एलसीडी अश्या आकर्षित पारितोषिकांचा समावेश आहे. त्यासह पाच मानाच्या पैठण्या विजेत्या महिलांना मिळणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने महिलांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मालती शेळके यांनी केले आहे.