आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते अंचरवाडीत आज, हिंदूसूर्य महाराणा प्रताप पुतळा सौंदर्यीकरण कामाचे लोकार्पण! माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा राहणार उपस्थित
Tue, 9 May 2023

अंचरवाडी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हिंदुसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन अंचरवाडी येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामवंत वक्ते जयपालसिंग गिरासे यांचे व्याख्यान काल, ८ मे रोजी संपन्न झाले. आज,९ मे रोजी माजी पालकमंत्री तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते हिंदुसूर्य महाराणा प्रताप पुतळा सौंदर्यीकरण कामाचे लोकार्पण होणार आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचीदेखील यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे.
(जाहिरात)
(जाहिरात)
आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळा सौंदर्यीकरण कामासाठी आमदार निधीतून निधी दिला होता. सौंदर्यीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात असून आज त्याचे लोकार्पण होणार आहे. सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदुसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.