टिप्परवाल्याने घेतला ४ वर्षीय चिमुकल्याचा बळी! शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑटोला उडवले! ३ विद्यार्थी गंभीर जखमी; नांदुरा तालुक्यातील घटना! अवैध रेतीमाफियांना अभय कुणाचे?

याआधी याच टिप्परने घेतले होते बळी..
 
 
kjsdjfds

शेंबा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): या टिप्परवाल्यांना खरच कुणाच्या जीवाची कदर नाही का हो?. वाईट मार्गानं अमाप पैसा कमविण्याच्या नादात हे टिप्परवाले आणखी किती बळी घेणार..असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडतोय..त्याच कारण अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने आतापर्यंत अनेकांचे आयुष्य उध्वस केलय..नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथील ४ वर्षीय चिमुकला आदित्य उमेश मुकुंद देखील टिप्परचा बळी ठरला.त्याचे तीन दोस्त देखील अपघातात गंभीर जखमी झालेत. आज,२१ सप्टेंबरच्या दुपारी साडेअकराच्या सुमारास टाकरखेड बेलुरा गावाच्या दरम्यान टिप्परने शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला उडवले, त्याच ऑटोत आदित्य बसलेला होता.

 प्राप्त माहितीनुसार शेंबा येथील सरस्वती कॉन्व्हेन्ट मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन जवळा बाजार येथील ऑटो शेंबा गावाकडे जात होता. त्यावेळी टिप्परने ऑटोला जबर धडक दिली. या अपघात अभिषेक चा जागीच मृत्यू. ऑटोतील  अन्य ३ विद्यार्थी गंभीर जखमी असून एकाला अकोल्याला हलविण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार याच टिप्परने काही दिवसाआधी एकाचा बळी घेतला होता. या भागात रेतीची अवैध वाहतूक होते. रेतीमाफिया पैसे कमवण्याच्या नादात कुणाच्या जीवाची पर्वा करीत नाहीत, मात्र या भागात रेतीमाफियांचा सामान्यांच्या जीवावर बेतणारा एवढा सुळसुळाट सुरू असला तरी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन का गप्प आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.