सर्पदंशाने तिघे घायाळ! जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती! शेतात काम करत होते...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पावसाळ्याचे दिवस असल्याने नाना प्रकारचे साप बिळातून बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच सर्पदंशाने जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या तिघा शेतकऱ्यांना शेतात काम करीत असताना, घायाळ केल्याची माहिती समोर आली आहे. तिघा गंभीरांमध्ये एका ६० वर्षीय वृद्धाचा तर दोन महिलांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, आज दिवसभरात या तीन घटना घडल्या आहेत. 
    Add
सर्पदंश झालेल्या या तीनही रुग्णांवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोताळा तालुक्यातील गिरोली शिवारात ६० वर्षीय दशरथ राठोड हे आपल्या शेतात काम करीत होते. दरम्यानच एका सापाने त्यांच्या पायावार चावा घेतला. जवळच असलेल्या किन्होळा शिवारातही तसेच घडले. लताबाई वैरालकर यांना ही शेतातच सापाने दंश केला. तिकडे बुलडाणा तालुक्यातील वरवंड येथील ३० वर्षीय सीमा फासे यांनाही सापाने दंश केला. या तिघांनाही तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या तिघांवरही उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.