अशानं त आमचे संसार उद्ध्वस्त होतील! जानेफळच्या काळी पिवळी संघटनेचा नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध; आज गाड्या बंद ठेवल्या...

 
Bzbx

जानेफळ(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरातील चालकांकडून विरोध होतोय..ट्रक चालक मालक संघटनेने देशव्यापी बंद पुकारलाय..आता या बंदला जानेफळच्या काळी पिवळी चालक मालक संघटनेने पाठींबा दिलाय..तशा आशयाचे निवेदन आज स्थानिक ठाणेदारांना देण्यात आले.

  अपघात झाल्यास त्यासाठी जबाबदार चालकाला १० लाखांचा दंड व १० लाखांचा कारावास अशी तरतूद केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कायद्यात आहे. अपघात हा अपघात असतो, तो मुद्दामहून घडवून आणलेला नसतो. अपघात आणि घात यात फरक आहे असे जानेफळच्या काळी पिवळी चालकांचे म्हणणे आहे. अशा कायद्याने तर आमचे संसार उध्वत होतील ..त्यामुळे हा कायदा मागे घ्यावा असे म्हणत जानेफळच्या काळी पिवळी चालक संघटनेने आज एकदिवसीय कामबंद आंदोलन केले आहे.