जिल्ह्यातील दिव्यांगांना असा मिळालाय दिलासा!

अस्थिव्यंग व नेत्रव्यंग तपासणी दर बुधवारी तर नाक, कान व घसा दिव्यांग तपासणी दर शुक्रवारी
 
दिव्यांग
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्हा रुग्णालयात यापुढे अस्थिव्यंग व नेत्र प्रवर्गातील दिव्यांग तपासणी शिबिर नियमितपणे महिन्यातील दर बुधवारी व मतिमंद/मनोरुग्ण व कान- नाक - घसा संबंधित दिव्यांग तपासणी महिन्यातील दर बुधवारऐवजी दर शुक्रवारी करण्यात येत आहे.
नियमितपणे अस्थिव्यंग, नेत्र, कान, नाक व घसा, मतिमंद/मनोरुग्ण संबंधित दिव्यांग बोर्ड महिन्यातील प्रत्येक बुधवारी सुरू आहे. या बोर्डामध्ये बऱ्याच प्रमाणात दिव्यांग व्यक्तींची एकाचवेळी गर्दी होत असल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याची दिव्यांग बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.