बुलडाण्यात "या" शत्रूचे आक्रमण! हिरवी संत्रा बाग झाली काळी!लाखोंचे नुकसान, शेतकरी काय म्हणतात?

 
Yujj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील संत्रा बागेवर रेड माईट रोगाने हल्ला चढवीला असून, उत्पादकांचे लाखोंचे नुकसान होत आहे. लोणार तालुक्यातील कारेगाव येथील विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याच्या ७ एकर संत्रा बागेतील रेड माईट रोगाने जवळपास १५ ते १६ लाखांचे नुकसान झाल्याने, त्यांनी सरकारने संत्रा उत्पादकांना तातडीने २ लाखांची पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.

बुलडाणासह विदर्भातील संत्रा बागांवर रेड माईट रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव, संग्रामपूर, लोणार परिसरात हिरवी संत्रा बाग काळी- पिवळी पडली.

यावर्षी संत्रा बागेवर रेड माईट रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ७ एकरातील संत्र्यांची फळे काळी पडल्याचे संत्रा उत्पादक विठ्ठल गायकवाड यांनी सांगितले.संत्र्यांची फळं काळी पडल्याने ही फळं कोणता व्यापारी घेणार? परिणामीजिल्ह्यातील फळबाग उत्पादकांचे चित्र विचित्र झालं आहे.काही शेतकऱ्यांनी बांधलेली शेततळी कोरडी पडली. विहिरी व बोअरवेलन्सनी तळ गाठला. तरी फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यानी लाखो रुपये खर्चून टँकरने पाण्याची व्यवस्था केली आहे.मात्र, दिवसेंदिवस खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेत. त्यातच रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे समाधानकारक व चांगल्या प्रतीचे उत्पन्न मिळालेले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून,सरकारने संत्रा उत्पादकांना तातडीने २ लाखांची पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.