घराला कुलूप पाहून चोरट्यांनी मारला हात,१ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास! देऊळगाव राजा शहरातील घटना.
Mar 4, 2024, 08:56 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील समता नगर परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याप्रकरणी काल ३ मार्च रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना २ मार्चच्या सायंकाळी घडली. या प्रकरणी रवींद्र नाथा इंगळे यांनी ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रवींद्र इंगळे हे १ मार्चला घराला कुलूप लावून गावी गेले होते. त्यावेळीच घराचे बंद दार पाहून अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. घराचे कुलूप तोडून ते आत शिरले, घरात असलेले लोखंडी कपाट तोडून त्यामधून १ लाख ,४२ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. अज्ञात चोरट्यांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.