त्यांनी आग लावली पण भाजपच्या विष्णु घुबेंनी जे केलं ते सकारात्मक..! "त्या" शेतकऱ्यांचा दसरा केला गोड...

 
Fhhj
देऊळगाव घुबे (ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत आगलावे वाढलेत..दुसऱ्याचं चांगल झालेलं या आगलाव्यांना दिसत नाही. सोयाबीन सुड्या पेटवून देत हे आगलावे विकृत आनंद मिळवतात, मात्र ज्या शेतकऱ्याने पोटच्या लेकराप्रमाणे पिकांना वाढवलं त्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हे आगलावे हिसकावून घेतात..या आगलाव्यांना भाजपचे चिखली तालुका उपाध्यक्ष विष्णू घुबे यांनी सकारात्मक कृतीने उत्तर दिले आहे. बेराळा, रामनगर, पिंपळवाडी येथील काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सुड्या भामट्या आगलाव्यांनी पेटवून दिल्या होत्या. विष्णू घुबे यांनी काल दसऱ्यानिमित्त सदर शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना तातडीने आर्थिक मदत करीत शेतकऱ्यांचा दसरा गोड केला.
  बेराळा येथील शेतकरी भरत शिवसिंग सुरडकर, रामनगर येथील शेतकरी बाबुराव अनपट व भानुदास विश्वनाथ भगत, पिंपळगाव येथील शेतकरी अशोक बाबुराव गालट या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन विष्णू घुबे यांनी त्यांना मदत केली. यावेळी बेराळा येथे सरपंच रामेश्वर सुरडकर, शिवशंकर सुरडकर, पंढरी सुरडकर, रामनगर येथे सरपंच विजयनाथ शितोळे, नंदु लेंडे, सदाशिव कदम,मधुकर कदम, पिंपळवाडी येथे राहुल मिसाळ , माजी सरपंच दिपक घुबे, गणेश घुबे, दत्ता घुबे, प्रसन्न घुबे, शुभम घुबे उपस्थित होते.