चिखलीत गुंडागर्दी वाढली! चांगलं सांगणाऱ्याचच फोडलं डोकं! नेमके काय घडले ! वाचा...

 
Hdhdh
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरात दिवसेंदिवस गुंडागर्दी वाढली आहे. येथील गौरक्षणवाडी भागात भांडण सुरू होते,मात्र भांडण थांबवण्याचे सांगणाऱ्यालाच मारहाण झाल्याची घटना काल १९ जानेवारीच्या रात्री उशिरा घडली. दिलेल्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात महंमद परवेज महम्मद हनीफ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शेख शमशेर शेख रशीद कुटुंबासह रात्री घरी होते. त्यावेळी त्यांना बाहेर भांडणाचा आवाज येत होता, त्यामध्ये महम्मद परवेज एकाशी भांडण करताना दिसला. "तुमच्या भांडणाचा त्रास होतो इथे भांडू नका" असे त्यांनी महम्मद परवेज ला उद्देशून म्हटले. मात्र महम्मदने त्यांच्यावरच हल्ला केला. डोक्याला दगड मारून त्यांना शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगून शेख समशेर शेख रशीद यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. महंमद परवेज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार शांता मगर करत आहेत.