'या' तीन रेती घाटांची ई- निविदा नाही !

 
रेती
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील सन २०२१- २२ या वर्षासाठी २३ रेतीघाटांची द्वितीय ई- निविदा आणि ई-लिलाव सूचनेचा कार्यक्रम २१ डिसेंबरला  प्रसिद्ध करण्यात आला होता. तथापि संचालक, भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, नागपूर यांनी २३ रेती घाटांपैकी गोडेगाव, गोळेगाव खुर्द (ता. जळगाव जामोद) व इटखेड (ता. संग्रामपूर) या तीन रेतीघाटांचे मायनिंग प्लॅन नामंजूर केले आहेत. त्यामुळे या तीन रेतीघाटांची ई निविदा अणि ई लिलाव लावण्यात येणार नाही, असे अप्पर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.