जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा! रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन..
Apr 17, 2024, 09:11 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त केंद्रात रक्त साठा संपुष्टात येत आहे. काही दिवस पुरेल इतक्याच रक्त पिशव्या रक्त केंद्रात उपलब्ध आहेत. त्यामुळे समाजातील विवीध क्षेत्रातील संघटनांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Advt. 👆
रक्त केंद्रातून प्रति महिना सरासरी ३०० रक्त पिशव्या निशुल्क रक्त संक्रमणासाठी उपलब्ध होतात. उन्हाळा आणि इतर कारणांमुळे रक्तदान शिबिराचे आयोजन होत नाही. त्यामुळे रक्त संकलन ठप्प झाले आहे. सध्या रक्त केंद्रात १५ रक्त पिशव्या शिल्लक आहेत. थेलेसिमिया व सिकलसेल रुग्णांना कायमस्वरूपी आणि अपघात झालेल्या व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांना आपात्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आणि धार्मिक संघटनांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर प्राची तायडे यांनी केले आहे.