बुलडाणेकरांची तहान भागवणारे येळगाव धरण अद्याप तहानलेले! मुख्याधिकारी पांडे म्हणतात, पाणी जपून वापरा

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) : बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणार येळगाव धरण अजूनही तहानलेल आहे. केवळ 27 टक्के जलसाठा धरणामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याचा नागरिकांनी वापर जपून करावा असे आव्हान मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.
अर्धा पावसाळा उलटून गेला असला तरी बुलढाणा शहर व लगतच्या गावांना पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण अजूनही तहानलेलच केवळ 27% जलसाठा उपलब्ध आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी येळगाव धरणात 19 ते 20 टक्के जलसाठा होता. पावसाळा सुरू झाल्यावर जून आणि जुलै महिन्यात धरणातील जलसाठ्यामध्ये केवळ सात ते आठ टक्के वाढ झाली आहे.. तथापि अर्धा पावसाळा बाकी असून लवकरच जोरदार पाऊस पडून येळगाव धरण भरेल मग बुलढाणा करांची वर्षभराची चिंता मिटेल अशी अपेक्षा आहे.त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.....