सुंदरखेडच्या महिला वैतागल्या; कचरा कुठे टाकू गं बाई! अन् ग्रामपंचायतीची काही सुविधाच नाही..!

 
Bxbxn
बुलडाणा(अभिषेक वरपे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाणा शहरालगत वसलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे सुंदरखेड. नाव "सुंदर"असले तरी पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीत शहरी भागाचा आवास आहे. त्यामुळे याभागात स्थलांतरिताचे प्रमाण देखील दिसते. मात्र सुंदरखेडमध्ये घराघरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले आहे. त्यामागचे कारण म्हणजे सुंदरखेड नगरीत कचरा संकलनासाठी कचरा गाडीच येत नाही, त्यामुळे परिसरातील महिला वैतागल्या आहेत. कचरा कुठे टाकू ग बाई अन् ग्रामपंचायतीची काही सुविधाच नाही अशी ओरड महिलांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित नक्कीच होत आहे.
 बुलडाणा शहर जोडले गेले असल्याने शहरात काही ठिकाणी कचरागाडी पाहायला मिळेल. परंतु अशात त्या गाड्याही कमी प्रमाणात दिसताएत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानाचे प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट आहे. शहरात स्वच्छ शहर सुंदर शहर असे उपक्रम पालिकेतून राबवले जातात. मात्र ग्रामपंचायत परिसरातील स्वच्छतेसाठी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत प्रशासनाने लक्षपूर्वक पायाभूत सुविधांच्या पूर्ततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मग कचऱ्याची विल्हेवाट कशी? 
रस्त्यावर कचरा टाकने अथवा जाळणे दंडनीय अपराध आहे. मात्र अद्यापही याप्रकरणी कारवाई झाल्याचे दिसले नाही. तसेच दीर्घकाळ कचरा पडल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे जागोजागी कचराकुंड्या असणे महत्वाचे आहे. तसेच दररोज सकाळी घराबाहेर कचरागाडी येणे आवश्यक आहे. त्यामुळे बाहेर टाकण्यात येणारा कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत.पुढे देखील कचऱ्याचे व्यवस्थापन असणे आवश्यक आहे.