वेटर मोटारसायकल घेऊन गेला, हॉटेलमालक वाट पाहून पाहून दमला! अंढेरा फाट्यावरील घटना

 
दुचाकी चोर
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकल घेऊन गेलेला वेटर ५ मिनिटांत येतो म्हणून गेला. मात्र ८ दिवस होऊनही परतला नाही. अखेर हॉटेलमालकाने वेटरविरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात काल, ३१ डिसेंबर रोजी तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गणेश शिवाजी पोमणे (रा. मंठा, जि. जालना) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चिखली- देऊळगाव राजा रोडवरील अंढेरा फाट्यावर सेवानगर (ता. देऊळगाव राजा) येथील सुभाष राठोड यांचे अशोक नावाचे हॉटेल आहे. त्या हॉटेलवर तीन वेटर त्यांनी कामासाठी ठेवले होते. २२ डिसेंबर सकाळी १० वाजता वेटर गणेश पाेमणे ५ मिनिटांत येतो असे म्हणून त्‍यांची मोटारसायकल घेऊन गेला. राठोड त्याची वाट पाहून पाहून थकले. अखेर काल, ३१ डिसेंबर रोजी अंढेरा पोलीस ठाण्यात वेटर गणेश पोमणे याच्याविरुद्ध मोटारसायकल चोरीची तक्रार दिली.