चोरट्याचा 'डाव' फसला ; खान्देश - मेहकर गाडीत महिलेचे मंगळसूत्र चोरताना रंगेहात पकडले! बुलढाणा बसस्थानकावरील घटना..

 
गेल्या
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृतसेवा) बस स्थानक हा भुरट्या चोरट्यांचा अड्डा बनला आहे. बसस्थानक परिसरात दररोज चोरीच्या घटना उघडकीस येतात. दरम्यानच, बुलढाणा बस स्थानक परिसरात एका चोरट्याचा महिलेचे मंगळसूत्र लंपास करण्याचा डाव फसला. गळ्यातील मंगळसूत्र चोरी करताना चोरट्याला महिलेने रंगेहात पकडले. काल ९ जूनच्या सायंकाळी ही घटना घडली. 
  प्राप्त माहितीनुसार, मेहकर येथील डॉ. ज्योती पारवे असे प्रवासी महिलेचे नाव आहे. मेहकर येथे जाण्यासाठी ९ जून रोजी त्या सायंकाळी बुलढाणा बस स्थानकात उभ्या होत्या. जवळपास ५:३० वाजेची जळगाव खान्देश - मेहकर ही बस लागली. मुलांना समोर चढवून, बॅग पकडून सौ. डॉ. पारवे ह्या बसमध्ये चढल्या. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ येऊन म्हणाला की, तुमचे पैसे पडले आहे. यामुळे त्यांनी खाली पाहिले. दरम्यानच, त्या व्यक्तीने सौ पारवे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला परंतु अर्धे मंगळसूत्र हातात घट्ट पकडून ठेवल्याने चोरट्याची संधी हुकली. चोरीचा डाव फसला, असे क्षणातच चोरट्याच्या लक्षात आले. त्यावेळी त्याने सुसाट्याने पळ काढला. त्यानंतर त्याचा पाठलाग करण्यात आला. बसस्थानक परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी इतर लोकांच्या मदतीने त्याला पकडले. विचारपूस केल्यानंतर अमोल तान्हाजी डुकरे (३४ वर्ष) रा. भादोला असे चोरट्याचे नाव असल्याचे समजले. महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा पोलिसांनी अमोल डुकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.