सुर्य तापणार! गहू आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनो हवामान विभागाने दिलेल्या "या" सुचना वाचाच....!

 
Pani
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   फेब्रुवारी महिना अर्ध्यापेक्षा अधिक आटोपला असून आता उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. दरम्यान पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचे हवामान विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आज,१७ फेब्रुवारीला भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहणार असून तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान केंद्र बुलडाणा व कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा यांच्याद्वारे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानबदल जागृत करण्याचे काम करण्यात येते. हरभरा पिकाला परीपक्वतेच्या काळात घाटे आणि पाणी पिऊन पडत असताना ओलीत बंद करावे, वेळेवर पेरणी केलेल्या गव्हाला पीक फुलोऱ्यात असताना (६५ ते ७० दिवस) ओळीत करणे आवश्यक आहे. तसेच उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला पीक कांडी धरण्याच्या अवस्थेत असताना (४५ ते ५० दिवस) पाणी दिल्यास फायदेशीर ठरते. वाढीच्या अवस्थेत असताना पिकाला ताण पडणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी, अन्यथा  उत्पादनात १० ते १५ टक्के घट होऊ शकते असे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.