राज्यातील प्रतिभावंत कवी, गुणी गझलकार अपूर्व राजपूत बुलढाण्यात ! युवाशाहीर विक्रांत राजपूत आणि सेवानिवृत्त अभियंता विजयसिंग राजपूत यांच्याकडून सहृदय सत्कार..

 
Fjjfj
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) प्रतिभा, कर्तुत्व आणि मानवी गुणांनी उपयुक्त ठरणारा कलाकार सगळ्यांच्याच हृदयमनावर राज्य करतो. असा नावलौकिक मिळवलेला कलाकार, प्रत्यक्षात भेटला तर धन्य आज दिनू संतदर्शनाचा... या भावनेचे प्रकटन होणे सहाजिक आहे. माणसात देव आहे, कलेत देव आहे असे म्हणतात, हे अगदी खरंय. कारण, महाराष्ट्राच्या संस्कृतीत आवडत्या कलाकाराचे पूजन करण्यात येते. त्यांचा सत्कार करण्यात येतो. असाच सत्कार महाराष्ट्रातील नामवंत, प्रसिद्ध कवी, गुणी गझलकार अपूर्व राजपूत यांचा आज १९ जुन रोजी बुलढाणा येथे झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता विजय सिंग राजपूत यांच्या निवासस्थानी अपूर्व राजपूत यांनी भेट दिली. यावेळी , अपूर्व राजपूत यांच्या भेटीसाठी युवाशाहीर विक्रांत राजपूत, पत्रकार अभिषेक वरपे हे देखील उपस्थित होते.