बुलडाण्याचा भूमिपुत्र लढवणार युवक काँग्रेसचा किल्ला! डोमरुळच्या विश्वदिप पडोळ यांची प्रदेश युवक काँगसच्या प्रवक्तेपदी निवड

 
kjkjskf
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील डोमरुळ येथील विश्वदिप पडोळ यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी एका पत्राद्वारे ही नियुक्ती केली. याआधी विश्वदीप पडोळ यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी होती.
 

kfjljls 

राजकीय दृष्ट्या आतापर्यंत कायम दुर्लक्षित असलेल्या डोमरुळ येथील विश्वदीप पडोळ हे राज्यपातळीवर  काम करणारे गावातील एकमेव तरुण ठरले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून "यंग इंडिया के बोल"  या राज्यस्तरीय निवड चाचणीतून काँग्रेस प्रवक्त्यांची निवड केली जाते. दिल्ली येथे आयोजित या निवड चाचणीतून विश्वदीप पडोळ यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. या नियुक्तीबद्दल जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, विजय अंभोरे, लक्ष्मणराव घुमरे, नंदु शिंदे, महेंद्र बोर्डे, गजानन लांडे पाटील यांच्यासह मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.