चिखली तालुक्यातील नायगाव बुद्रुक ग्रामपंचायमधील सचिव आणि संगणक परिचालक सतत गैरहजर राहतात ! चौघांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार..

 

चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील नायगाव बु. येथील सचिव अमोल प्रकाश मगर तसेच संगणक चालक सतत ग्रामपंचायत कार्यालयात गैरहजर राहतात. त्यामुळे गावकऱ्यांना त्रास भोगावा लागत आहे. अशी तक्रार  (दि.४ डिसेंबर ) सोमवारी आशिष जवंजाळ, संतोष जंवंजाळ, मोहन जवंजाळ, व अमोल मोरे यांनी गटविकास अधिकारी चिखली यांच्याकडे दिली आहे. पुढील सात दिवसात सचिव आणि संगणक परिचालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 

dhanik

सदर निवेदनात नमूद आहे की, ग्रामपंचायत सचिव आणि संगणक चालक नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात गैरहजर असतात त्यामुळे गावकऱ्यांना कागदपत्रे काढण्यासाठी चिखलीमध्ये यावे लागते. इतकंच नाही तर, ग्रामपंचायतीच्या सी. एस. सी आयडी चा वापर ते चिखली येथे स्वतःच्या दुकानात करत आहेत. पुढील सात दिवसा  त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. अशी मागणी करण्यात आली आहे.