शाळा तशी चांगली पण शिक्षकाअभावी पांगली! अंचरवाडीच्या जि. प. मराठी उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता!

तात्काळ नियुक्ती करा अन्यथा "शाळा बंद" आंदोलन! सरपंच कोकिळाताई परिहार यांचा इशारा..!
 
चिखली
चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरावी अन्यथा शाळा बंद आंदोलन करु असा इशारा ग्रामपंचायतच्या सरपंच कोकिळाताई परिहार यांनीदिला आहे. या संदर्भात चिखली पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
शाळेत सहाय्यक शिक्षकाचे एक पद रिक्त आहे, तसेच सहाय्यक शिक्षिका यांची प्रतिनियुक्ती झाल्यामुळे सध्या शाळेला दोन शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ,तसेच शैक्षणिक कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा पुढील दिवसात शाळा बंद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.