कव्हळ्याचे सरपंच ठेकेदाराला पैसे मागतात! १५ नाही २० हजार द्या म्हणतात; ठेकेदार म्हणतो,बाकीचे सरपंच ५ हजारात सह्या करून देतात;

सरपंच म्हणे, तुम्ही कव्हळ्यात काम करू नका, आमदाराशी आमचं काही गुतत नाही! कथित कॉल रेकॉर्डिंगने खळबळ

 
recording

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील कव्हळा येथील सरपंचांची कथित कॉल रेकॉर्डिंग ची क्लिप व्हायरल झाली आहे. गावात काम करू द्यायच्या बदल्यात सरपंच रविंद्र डाळीमकर ठेकेदाराला पैशाची मागणी करीत असल्याचे ऑडिओ क्लिप मध्ये ऐकायला मिळते. ठेकेदार १५ हजार द्यायला तयार असताना सरपंच १५ नाही २० हजार द्या असं म्हणतात, त्यावर "बाकीचे सरपंच ५ हजार रुपयांत सह्या घेतात, तुम्ही एकटे भेटले एवढे पैसे मागणारे" असं ठेकेदार म्हणतात. त्यावर पुन्हा  "मग तुम्ही बाकीच्या सरपंचाकडून काम करून घ्या" कव्हळ्यात काम करू नका असा दम सरपंचांनी फोनवरून ठेकेदाराला भरल्याचे ऑडियो क्लिप वरून समोर आले आहे. संबधित सरपंच बीआरएस या पक्षाशी संबधित असून ठेकेदाराचे नाव "मदन पाटील" असल्याचे ऑडियो क्लिपमधील संभाषणावरून कळते.

हे काम आमदारांनी मला दिले आहे, काम आमदार निधीतून आहे असे असे ठेकेदाराने सरपंचांना सांगितले असता "आमदाराशी माझे काही गुतत नाही" असं सरपंच म्हणतात. १५ नाही २० हजार द्या, तुमच्यासाठी ही गोष्ट चिल्लर आहे.आम्हालाही लोक सांभाळावे लागतात असं या सरपंचांन ठेकेदाराला म्हटल. त्यावर "तुम्ही फक्त गावापुरते मर्यादित,आम्हाला जिल्हा सांभाळावा लागतो" असं ठेकेदार सरपंचाला म्हणतात तेव्हा ही बाब सरपंचाच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे ऑडियो क्लिप मधील संभाषणातून कळते. या ऑडियो क्लिपवरून गावच्या विकासापेक्षा सरपंचांना स्वतःच्या विकासात जास्त रस  असल्याचे दिसते.