जिल्हाच्या ग्रामीण मंत्रालयाचा कारभार भुमीपुत्राच्या हाती! आयएएस विशाल नरवाडे बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी!

 
Ceo
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
भाग्यश्री विसपुते यांची बदली झाल्यानंतर बुलडाणा जिल्ह्याच्या मुख्याधिकारी पदी कुणाची वर्णी लागणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. अखेर याची उत्सुकता निकाली निघाली असून आयएएस अधिकारी विशाल नरवाडे आता बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कारभार सांभाळणार आहेत. विशाल नरवाडे हे बुलडाणा जिल्ह्यातीलच रहिवाशी असून बुलडाणा तालुक्यातील धाड जवळील सावळी हे त्यांचे गाव आहे. 
भ्रष्टाचारामुळे डागाळलेली जिल्हा परिषद प्रशासनाची उजळवण्याची जबाबदारी आता नरवाडेंवर 
 विशाल नरवाडे हे २०१९ च्या बॅच चे आयएएस अधिकारी आहेत. त्याआधी २०१६ मध्ये ते आयपीएस देखील झाले होते, मात्र त्यानंतर देखील युपीएससीचा सहावा प्रयत्न करीत ते आयएएस अधिकारी झाले होते.देशात त्यांना ९१ वी रँक मिळाली होती. विशाल नरवाडे यांचे प्राथमिक शिक्षण सावळी येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले होते.
आधीच्या मुख्याधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोप..
 दरम्यान दोन दिवसांपूर्वी आधीच्या मुख्याधिकारी भाग्यश्री विसपुते यांची बदली झाली. सौ विसपुते यांची कारकीर्द चांगलीच वादग्रस्त ठरली होती. त्यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. आता त्यांच्या जागेवर विशाल नरवाडे आले आहेत, भ्रष्टाचारामुळे डागाळलेली जिल्हा परिषद प्रशासनाची उजळवण्याची जबाबदारी आता नरवाडे यांच्यावर असणार आहे.