इसरुळ ते देऊळगाव घुबेचा रस्ता देतोय मृत्यूला आमंत्रण! रस्त्यामुळे प्रवाशांना भोगावा लागतोय त्रास..

 
Hhdbs
देऊळगाव घुबे (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: ऋषी भोपळे): जालना ते खामगाव अशा महत्त्वाच्या मार्गाला  जोडल्या जाणारा चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे ते इसरुळ  या रस्त्याची  अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.  खराब रस्त्यामुळे अनेक वाहनांचा बिघाड झाल्याचे दिसून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या पुनर्निर्मिती साठी  दखल घेतली जात  नसल्याने ग्रामस्थांसह प्रवाशी वर्गात मोठी  नाराजी व्यक्त होत आहे. सुमारे  १० ते  १५ किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावर दररोज शेकडो वाहनांची वाहतूक चालते. 

वाहन चालकांना व  प्रवाश्यांसाठी डोखे दुःखी ठरलेल्या इसरुळ देऊळगाव घुबे या रस्त्यावर आजवर अनेक अपघात घडले आहेत.   मलगी ते इसरुळ रोडवर कमीत कमी दहा ते पंधरा गावे लागून आहेत त्यांना तालुक्याच्या ठिकाणी येण्या जाण्या साठी हाच प्रमुख मार्ग आहे. शेतकरी वर्गाना, व्यावसायिकांना त्यांच्या शेतातील शेतमाल विक्री साठी चिखली येथे नेण्या करीता हा रस्ता सोडून दुसरा कुठला पर्याय नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता समजत नाही.हा रस्ता जणू मृत्यूचे आमंत्रण देणारा  बनला आहे की काय? अशी ओरड  ग्रामस्थ  करत आहेत. विशेष म्हणजे या भागात  राजकीय पक्षातील अनेक पदाधिकारी राहतात.  तरी सुद्धा रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग ने लक्ष देऊन रस्त्याचे काम मार्गी लावावे  अशी आर्त मागणी प्रवासी आणि वाहन चालक करत आहेत.