झाडे लावण्यासाठी रस्ता दुभाजकामध्ये हवी काळी माती, कंत्राटदार दगडी मुरूम टाकून मोकळा झाला! राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आणि पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष..

 

अंढेरा(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली जालना राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्याठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम देखील संथगतीने सुरू आहे. यारोडच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असताना रोडच्या मधोमध दुभाजकामध्ये झाडे लावण्यात येत आहे. परंतु झाडे लावण्यासाठी असलेल्या दुभाजकाच्या जागेत काळ्या माती ऐवजी दगडी मुरूम टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. झाडे लावण्यासाठी काळी माती टाकावी लागते, हे माहिती असताना देखील कंत्राटदार दगडी मुरूम टाकून मोकळा झाला. याकडे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आणि पदाधिकारी यांचे देखील दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

चिखली-जालना राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात अनेक ठिकाणी अनियमितता दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच रुंदीकरणाचे काम करताना रोडची उंची वाढविल्याने रोड लगतच्या जमीन मालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.