"पहेल इन्स्टिट्यूट" ने रचला इतिहास! बुलडाण्यात तयारी करून "सृष्टी सावळे" ची नागपूरच्या AIIMS मध्ये झाली निवड;पहेल इन्स्टिट्यूट चे निखिल श्रीवास्तव म्हणाले,

इतिहासात प्रथमच बुलडाण्याच्या लेकीची ची AIIMS मध्ये भरारी..

 
fdkjd

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..ही बातमीच बुलडाणेकरांसाठी अभिमानास्पद आहे.बुलडाणेकरांची मान गौरवाने उंचावणारी आहे..अनेकांना अशक्य वाटणारी बाब बुलडाण्याच्या लेकीन करून दाखवलीय..बुलडाणा शहरात नीट ची तयारी करून एमबीबीएस साठी AIIMS  नागपुरला प्रवेश मिळवणारी सृष्टी सावळे ही पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.. बुलडाणा शहरात अल्पावधीत शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या पहेल इन्स्टिट्यूट चा सृष्टी चा यशात मोठा वाटा असल्याचे ती सांगते..

वैद्यकीय क्षेत्रात AIIMS मधून करिअर करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. संपूर्ण देशभरातून अतिशय निवडक विद्यार्थ्यांची यात निवड केली जाते. AIIMS मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर त्यासाठी लातूर, कोटा ,छत्रपती संभाजीनगर येथेच लाखो रुपये खर्चून नीट ची तयारी करावी लागते असा भ्रम विद्यार्थी आणि पालकांमध्ये होता. मात्र या भ्रमाला छेद देण्याचे काम करीत हे सगळ बुलडाणा शहरात आपल्या माणसांच्या सानिध्यात राहून आणि कमी खर्चात शक्य असल्याचं सृष्टी सावळेन मिळवलेल्या यशानं स्पष्ट झाले आहे.पहेल इन्स्टिट्यूट च्या तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात  अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि चिकाटीने अनेक आव्हानांना पार करीत सृष्टीने यशाच्या शिखराला गवसणी घातली आहे. बुलडाणा जिल्ह्यात नीट ची तयारी करून डॉक्टर बनण्याची महत्वकांक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सृष्टी चे यश प्रेरणा देणारे ठरणार आहे. सृष्टीचे वडील किशोर सावळे  व कुटुंबियांच्या  कष्टाचे चीज झाले आहे.
   
 प्रेरणादायी....

बुलडाणा शहरात राहून AIIMS सारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवून सृष्टी सावळे हिने "पहेल इन्स्टिट्यूट" च्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. बुलडाणेकरांसाठी देखील ही बाब गौरवाची आहे. बुलडाण्याच्या लेकीची ही भरारी प्रेरणादायी व ऐतिहासिक ठरेल अशी प्रतिक्रिया पहेल इन्स्टिट्यूट चे संस्थापक संचालक प्रा. निखिल श्रीवास्तव यांनी दिली आहे. पहेल इन्स्टिट्युट चे व्यवस्थापक एस. आर. मंडलकर यांनी दिलेले मार्गदर्शन , प्रा. प्रविण रोकडे , प्रा. अर्जुन पंडीत  , प्रा. आर. आर. शेख  , प्रा. त्रिलोक कुमार , प्रा. ढवळे  यांचे मोलाचे मार्गदर्शन सृष्टीला मिळाले. तसेच श्री चेतन प्रधान , तेजस्विनी चौधरी , नयन अंगळे  ,अबोली खंडारे ,  नामदेव हिवाळे आदींनी यासाठी ही खुप मेहनत घेतली. याप्रसंगी पहेल इन्स्टिट्युटचे सह संचालक डॅा. राजेश्वर उबरहंडे व सौ. विद्या अरविंद पवार यांनी सृष्टीचे विशेष कौतुक केले आहे.