BREAKING भक्तीमहामार्गाचे आंदोलन पुन्हा पेटले; शेकडो शेतकऱ्यांचे पैनगंगा पात्रात जलसमाधी आंदोलन, न्याय मिळेपर्यंत बाहेर न निघण्याची भुमिका....

 
महामार्ग
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रस्तावित सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गाच्या विरोधात शेतकरी एकवटले आहेत. वारंवार त्या विरोधात भक्ती महामार्ग विरोधी कृती समिती आंदोलने करीत आहे. ६ ऑगस्टला चिखली तालुक्यातील करतवाडी या गावात शेतकरी पुत्रांनी टॉवर वर चढून अनोखे आंदोलन केले होते. त्याचवेळी मागण्या मान्य न झाल्यास आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज,१४ ऑगस्टला भक्ती महामार्ग पिढीत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, शेकडो शेतकरी पेठ जवळील पैनगंगा नदीपत्रात जलसमाधी आंदोलन घेण्यासाठी उतरले आहेत. जोपर्यंत भक्ती महामार्ग रद्द करण्याची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आक्रमक आंदोलकांनी घेतली आहे.