चिखली पोलिसांची कामगिरी! हरवलेले१८ मोबाईल शोधून काढले; नागरिकांचे समाधान..
Jul 17, 2024, 10:41 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मागील अनेक दिवसांपासून मोबाईल चोरीला गेल्याच्या अनेक घटना चिखली पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील विविध ठिकाणी या घटना घडल्या. मोबाईल चोरट्यांचा शोध लावून, नागरिकांना हरवलेले मोबाईल परत देण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान, चिखली पोलिसांनी यासाठी विशेष पथक स्थापित केले. हरवलेले १८ मोबाईल पोलिसांनी शोधून काढले. तब्बल दोन लाख रुपये किमतीचे हे मोबाईल फोन होते. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार विजय किटे, सुनील राजपूत, चंद्रशेखर मुरडकर, महिला पोलीस अंमलदार रूपाली उगले यांनी ही कामगिरी केली. गहाळ झालेल्या मोबाईल शोधण्यासाठी हे पथक कार्यरत होते. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे विविध ठिकाणावरून वेगवेगळ्या कंपनीचे एकूण १८ मोबाईल पथकाने शोधून काढले. तब्बल दोन लाख रुपयांचा मोबाईल माल पोलिसांनी हस्तगत केला. मूळ मालकांना हे मोबाईल परत देण्यात आले. चिखली पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत असून, हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे.