Amazon Ad

सख्खे शेजारी बनले पक्के वैरी; झाडाच्या फांद्या तोडल्यावरून झाले भांडण, विळ्याने मारून केले जखमी ! पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही केली मारहाण.. चिखली शहरातील घटना

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) घराच्या टीनपत्रावरील पालापाचोळा स्वच्छ करताना झाडाच्या फांद्या तोडल्याच्या कारणावरून दोन भावांनी शेजारी राहणाऱ्या एका सासू-सुने सोबत वाद केला. अश्लील शिवीगाळ करत हातावर विळा मारला. इतकेच नाही तर पोलीस ठाण्यातून तक्रार देवून आल्यानंतर देखील त्यांनी मारहाण केली. अशी तक्रार, चिखली पोलिसांत देण्यात आली आहे.
   
   शहरातील दिन दयालनगर परिसरातील रहिवासी स्वाती दीपक बैरागी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेजारी राहणारे मोहन बैरागी व सुनील बैरागी या दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटना ३जूनच्या दुपारची आहे. घरावरील टीन पत्रे स्वच्छ करण्यासाठी स्वाती बैरागी यांचे सासू-सासरे टीनावर गेले. टीनावरील पालापाचोळा साफ करत असताना शेजारी राहणारे सुनील बैरागी व मोहन बैरागी घरासमोर आले. घराला लागूनच त्यांचे झाड आहे. 'आमच्या झाडाच्या फांद्या तोडायच्या' नाही असे दोघे भाऊ म्हणाले होते. दरम्यान, तुझे सासू-सासरे आमच्या झाडाच्या फांद्या तोडत आहेत. असे म्हणत शिवीगाळ करू लागले. त्यावेळी फिर्यादी स्वाती बैरागी यांच्या सासू म्हणाल्या की, तुमच्या झाडाच्या फांद्या आमच्या टीनावर येतात, पाऊस पडल्यावर याचा आम्हाला त्रास होतो. असे म्हणताच सुनील बैरागी यानी घरातील विळा घेऊन स्वाती बैरागी यांच्या सासूच्या उजवा हाताच्या मनगटावर मारला. त्यामध्ये सासू विमल बैरागी या जखमी झाल्या आहेत. सासरे भगवान बैरागी हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांना मोहन बैरागी याने दगड मारून जखमी केले. फिर्यादी स्वाती बैरागी यांना देखील शिवीगाळ करत काठीने मारहाण झाली. त्यांनतर सासू-सासर्‍यांना उपचारासाठी चिखलीतील सामान्य रुग्णालयात दाखल केल्या गेले. दरम्यान ४ जूनच्या सायंकाळी स्वाती बैरागी ह्या घरी असताना सुनील आणि मोहन बैरागी घरात आले . तुम्ही काल पोलीस स्टेशन रिपोर्ट का दिला! या कारणावरून दोघांनी चाप्टा बुक्यांनी मारहाण केली. एके दिवशी तुम्हाला जीवाने मारून टाकतो अशी धमकीही देण्यात आली. आमच्या कुटुंबाला धोका असून दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी. असे तक्रारीत म्हटले आहे.