देव,देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तरुणांच्या पुढाकाराची गरज! हिंदुत्वाचे विस्मरण होऊ देऊ नका! भाग्यश्रीताई मोहिते यांचे प्रतिपादन;
अंचरवाडीत रामनवमीच्या निमित्ताने पार पडले व्याख्यान! बुलडाणा लाइव्ह चे कृष्णा सपकाळ म्हणाले, प्रभू श्रीरामांचे जीवन समाजासाठी अनुकरणीय

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हिंदुसूर्य महाराणा प्रताप या महापुरुषांनी धर्म रक्षणासाठी जीवन खर्ची घातले. आज धर्म, संस्कृती संकटात आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वडिलांनी छत्रपती शहाजी महाराज आणि आईने जिजाऊंची भूमिका बजावणे गरजेचे आहे. रामनवमी ,शिवजयंती व महापुरुषांच्या जयंती नाचून नव्हे तर विचारांचा जागर करून साजरा करीत असल्याबद्दल त्यांनी अंचरवाडी येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
प्रभू श्रीरामांचे जीवन अनुकरणीय: कृष्णा सपकाळ
आपल्या देशात प्रामुख्याने भगवान शिव, भगवान श्रीकृष्ण व प्रभू श्रीराम या तीन देवांतांचे सर्वत्र पूजन होते. भगवान शिव व भगवान श्रीकृष्ण हे देव पूजनासाठी आहेत. भगवान शंकरासारखे विष आपण पिऊ शकत नाही व भगवान श्रीकृष्णा सारख्या लीला करू शकत नाहीत. शिव आणि कृष्णाचे अनुकरण करता येणार नाही मात्र प्रभू श्रीराम अनुकरणीय आहेत. मानवत्वाकडून देवत्वाकडे जाणारा प्रवास म्हणजे प्रभू श्रीरामाचे जीवन आहे. मर्यादा पुरुषोत्तम,एक पत्नीव्रत हे श्रीरामांच्या जीवनातील पैलू आजच्या समाजासाठी अनुकरणीय असल्याचे कव्हरेज गुरू चे संचालक तथा बुलडाणा लाइव्हचे जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन परिहार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय परिहार, शिवदास परिहार, गणेश शिंगणे, पप्पूराजे गायकवाड, सचिन परिहार, गोपाल परिहार, दीपक शिंगणे, शिवशंकर शिंगणे, अविनाश परिहार, विलास परिहार, बालू राऊत, कडुबा परीहार, रवी भगवान परिहार, चेतन गाताडे यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.