स्मशानभूमीची जागा बळकवणाऱ्या मास्तरला परिणाम भोगावे लागणार! इस्लापुरच्या जिल्हा परिषद शाळेतील मास्तरने नेमक काय केलं वाचा?

 
Cbbb

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्मशानभूमी च्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या इस्लापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक रविकांत जाधव यांच्यावर शिस्तभंगांची कारवाई करण्यात आली आहे . जाधव यांचे सेवेतून निलंबन देखील करण्यात आले आहे.

बुलडाणा तालुक्यातील दत्तपुर/ अफजलपुर ग्रामपंचायतीमधील स्मशानभूमीची जागा अतिक्रमित केल्याप्रकरणी इजलापूर येथील जिल्हा परिषदेच्या सहाय्यक अध्यापक रविकांत पिराजी जाधव यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकारी एस जे पवार यांनी आदेश प्रसिद्ध केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दत्तपूर ग्रामपंचायतचे सचिव यांनी २८ जून रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. दत्तपूर -अफजलपुर मधील गट क्रमांक ३६ येथील ०.४० आर स्मशानभूमीच्या जागेवर सहाय्यक अध्यापक रविकांत पिराजी जाधव यांनी अतिक्रमण केले होते. याबाबत गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बुलढाणा यांनी २४ ऑगस्ट रोजी सादर केलेल्या चौकशी अहवालामध्ये अतिक्रमण केल्याची सत्यता तपासून जाधव यांनी जिल्हा सेवा वर्तणूक नियमाचा भंग केला असल्याचे स्पष्ट झाले. या आधारे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे सहाय्यक अध्यापक रविकांत जाधव यांची निलंबन करण्यात आले असून निलंबन काळात पंचायत समिती मुख्यालयातील शिक्षण विभागात त्यांना थांबावे लागेल. कार्यालय प्रमुखांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच गैरवर्तन केल्यास ते वेगळ्या शिस्तभंगाच्या कारवाई पात्र ठरतील असे निर्देश आदेशात नमूद केले आहेत. तसेच जाधव यांना खाजगी नोकरी किंवा उद्योग धंदा करता येणार नाही याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना सादर करणे अनिवार्य राहील.