अतिविराट मराठा क्रांती मोर्चा ला थोड्याच वेळात होणार सुरुवात! बुलडाणा शहर भगवेमय!१०० "पीआय" ची मोर्चावर नजर

 
Police
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सकल मराठा समाजाचा विराट मोर्चा आज,१३ सप्टेंबर रोजी बुलडाणा शहरात निघणार आहे. थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या उपोषणस्थळी लाठीचार्ज झाल्याने मराठा बांधव संतप्त झाले आहेत. मराठा आरक्षण मिळेपर्यंत आता मागे हटायचे नाही असा निर्णयच आता मराठा समाजाने घेतला आहे. त्याअनुषंगाने होणाऱ्या आजच्या मोर्चाची जय्यत तयारी झाली असून बुलडाण्यात लाखो मराठा बांधव जमायला सुरुवात झाली आहे. 

शहरात मोठी गर्दी जमणार असल्याने पोलिसांनी तगड्या पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. १ एसपी,२ अप्पर पोलीस अधीक्षक,६ डिवाएसपी, १०० पीआय  दर्जाचे अधिकारी  मोर्चाच्या बंदोबस्तावर नजर ठेवणार आहेत. याआधी २०१६ ला झालेला मोर्चा अतिविराट ठरला होता, आजच्या मोर्चाला देखील मराठा बांधवांचा जनसागर उसळण्याची शक्यता आहे.

आज होत असलेल्या मोर्चाला जरांगे पाटलांचे कुटुंबीय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोर्चाचे महत्व वाढवणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार जरांगे पाटलांची मुलगी या मोर्चाला संबोधित करणार आहे.