दहिद बु च्या ग्रामपंचायतला हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीचा विसर! सरपंच म्हटले,पत्नी आजारी होती; गावकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन,कारवाईची मागणी

गावकऱ्यांनी याप्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात शासन निर्णयाप्रमाणे महापुरुषांची जयंती साजरी करणे अनिवार्य आहे. परंतु दहिद बु येथील सरपंच अर्जुन दांडगे हे जातीय द्वेष निर्माण करून महामानवांच्या नावावर राजकारण करत आहे. काही ठराविक जयंत्या साजऱ्या करतात, परंतु काही सदस्यांनी जयंती साजरी केली तरी सरपंच अर्जुन दांडगे गैरहजर राहतात. जयंतीला उपस्थित राहत नाही व स्वतःहून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात व काही महामानवांच्या जयंती साजरा करू देत नाहीत असा स्पष्ट आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे. सरपंच ,ग्रामसेवक व सदस्यांची योग्य ती चौकशी करून गटविकास अधिकारी यांना सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावे असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.