सांभापुर ग्रामपंचायत'चा कारभार अन् चिखलात गाव!

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):सांभापुर गावात जिथे रस्ता आहे.तिथे नाली नाही आणि जिथे नाल्यांची आवश्यकता आहे तिथे काम हाती घेण्यात आले नाही.
Dada
Advt 👆
सांभापुर गावात भर रस्त्यात सांडपाणी वाहत असल्याने पावसाळ्यात ही समस्या अधिकच बिकट होत आहे. घाणीने तुंबलेल्या नाल्यांमुळे मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे.ज्या वॉर्डांमध्ये नाल्या नाहीत अशा ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. काही नाल्यांमधील गाळ उपसण्यात आलेला नाही. रस्त्यात खड्डे पडल्याने सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. हिंगणा - उमरा येथील रजणी जुमळे यांच्या घरापासून ते गल्लीबोळातील रस्त्यांना ओढ्या, नाल्याचे स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात घाण, दुर्गंधी पसरली आहे. गावाच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाने त्याकडे तात्काळ लक्ष घालून रस्त्यात तुंबलेल्या पाण्यामुळे रस्ते,नाल्या साफ करणे गरजेचे आहे. अशी मागणी स्थानिक गावकरी करीत आहेत.