येळगाव पुलावरील कठडा तुटला! वाहनधारकांनो जरा जपूनच...

 
येलगाव
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जलसाठे तुडूंब भरत आहेत. येळगाव धरणही १०० टक्के भरले असून यंदाच्या हंगामातील पहिला पूर नदीला आला. त्यामुळे रात्री काही काळ चिखली बुलडाणा मार्ग बंद होता. पाण्याच्या वेगवान प्रवाहाने पैनगंगा नदीच्या येळगाव पुलावरील कठडा तुटला आहे. 
पुलावर सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजूला लोखंडी कठडे लावण्यात आले होते. मात्र काल रात्री आलेल्या पुरामुळे एका बाजूचा अर्ध्यापेक्षा जास्त कठडा तुटला आहे. रात्रीच्या वेळेला पुलाचा काठ कोणता हे न समजल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कठड्याचे काम लवकरात लवकर पूर्ववत करण्याची गरज आहे.