कुत्रे मोकाट झाले..! २ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला; देऊळघाटची घटना

 
Fhnm
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दोन वर्षीय चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना आज सोमवारी दुपारी देऊळघाट येथे घडली आहे. कुत्र्याने चावा घेतल्याने चिमुकला किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.
     जोहान खान युसुफ खान असे या चिमुकल्याचे नाव आहे. जोहान हा देऊलघाट येथील इकबाल चौक परिसरातील रहिवासी आहे. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घरासमोर खेळत असताना एका मोकाट कुत्र्याने जोहाणच्या हातावर चावा घेतला. त्यांनतर त्याच्या आईवडिलांनी त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. जोहाणवर उपचार करण्यात आले आहे. देऊळघाट परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत आहे. यामुळे लहान मुलांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्याची शक्यता नाकारता येणे शक्य नाही. त्यामुळे परिसरातील मोकाट कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.