रात्री कुत्रा भुंकला, त्यांना जाग आली पण..!देऊळगाव घुबे शिवारातून ३ गाईंची चोरी!कत्तलीसाठी नेल्याचा संशय
Mar 27, 2023, 09:32 IST

देऊळगाव घुबे( ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव घुबे परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी हैदोस घातलाय. २५ मार्चच्या मध्यरात्री गोठ्यात बांधलेल्या ३ गाईंची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली. येथून जाफ्राबाद जवळ असल्याने या गाई कत्तलीसाठी नेल्या असाव्यात अशी चर्चा सुरू आहे.
देऊळगाव घुबे येथील शेतकरी गजानन अंबादास घुबे व त्यांचा पुतण्या आकाश शेतात नेहमीप्रमाणे झोपायला जातात.२५ च्या रात्री ते झोपलेले असताना त्यांचा कुत्रा जोरजोरात भुंकू लागल्याने त्यांना जाग आली, त्यावेळी त्यांनी गोठ्याजडे बघितले असता तिथे पीक अप वाहनाचे लाईट चमकलेले त्यांना दिसले. गजानन घुबे गोठ्याकडे पळाले तेव्हा "त्या" वाहनाने तिथून पळ काढला. त्यांनी गोठ्यात बघितले असता ३ गाई गायब दिसल्या . याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिस चोरांचा शोध घेत आहेत.