डॉक्टर दुचाकीने खामगावच्या दिशेने निघाले पण मध्येच, जे व्हायच नाही तेच झालं..

 
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकर येथून खामगांवच्या दिशेने जात असताना आज २७ डिसेंबरला दुपारी घाटनांद्रा फाट्यावर दुचाकीचा अपघात घडला. यामध्ये डॉक्टरसह एक महिला जखमी झाल्याची माहिती आहे.
डॉ. अमोल शामराव शेळके, असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यासह योगेश साबळे दुचाकीवर खामगाकडे निघाले होते. मात्र घाटनांद्रा फाट्यावर अचानकपने नियंत्रण सुटल्यावर पल्सर कंपनीची दुचाकी रस्ताकडेच्या लोखंडी रॉडला धडकली. त्यामध्ये चालक साबळे यांना काही दुखापत झाली नाही मात्र मागे बसलेले डॉक्टर आणि महिला यांना मार लागला. दरम्यानच बुलडाणा लाइव्हचे पत्रकार अनिल मंजुळकर, धनंजय इंगळे,सुशीलकुमार आडे, विकी इंगळे यांनी जखमींना उपचारासाठी ऑटोच्या सह्याने मेहकरातील दवाखान्यात दाखल केले.