जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.३६ टक्के !१८५५ विध्यार्थी झाले नापास..
Updated: May 28, 2024, 08:25 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दहावीच्या निकालात जिल्ह्याने मुसंडी मारत अमरावती विभागात तिसरे स्थान गाठले आहे.
बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९५.३६ टक्के इतका लागला आहे. वाशीम जिल्हा विभागात आघाडीवर असून अकोला जिल्हा दुसऱ्या क्रमाकावर आहे. यापाठोपाठ बुलढाणा जिल्हा तृतीय क्रमाकावर आहे.
मागील काही वर्षात दहावी व बारावीच्या निकालात आघाडीवर राहणाऱ्या बुलढाण्याचा बारावीचा निकाल कमी लागल्याने जिल्हा अमरावती विभागात शेवटच्या स्थानावर फेकला गेला होता.यामुळे दहावीच्या निकालाने जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळाला मोठा दिलासा मिळाला आहे. मुलींची टक्केवारी ९७.०२ तर मुलांची उत्तीर्णची टक्केवारी ९३.९९ इतकी आहे. परीक्षा देणाऱ्या ३९ हजार ९८२ पैकी ३८१२७ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहे.
सिंदखेडराजा आघाडीवर
दरम्यान ९८.१२ टक्केसह सिंदखेडराजा तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. नांदुरा ९१.७२ टक्केसह सर्वात तळाशी आहे.उर्वरीत तालुक्यांची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. बुलढाणा ९५.०३. मोताळा ९६.६२, चिखली ९६.९१, देऊळगाव राजा ९६.४७, लोणार ९६.०३, मेहकर ९६.५२, खामगाव ९६.५२, शेगाव ९५.२२, मलकापूर ९४.९७,जळगाव ९३.१८ आणि संग्रामपूर ९२.११.