जिल्हा स्त्री रुग्णालयाची यंत्रणाच "व्हेंटिलेटरवर" ! कर्मचारी, अधिकाऱ्यांची तीव्र कमतरता..

 
बुलडाणा (अभिषेक वरपे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)
जिल्हा स्त्री रुग्णालयात दिवसाला २० ते २२ प्रसूती होतायेत. एका महिन्यात हा आकडा चारशे पारही जातोय. शंभर खाटांचे हे हॉस्पिटल आता रुग्णांनी भरगच्च भरले आहे. असे असताना मात्र वैधकिय अधिकारी, प्रसुतीतज्ञ, बालरोग तज्ञ, स्टाफ नर्स यासारखे अनेक पदे रिक्त असल्याने विविध संकटांचा सामना करावा लागतोय. कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता भासत आहे.. प्राप्त माहिती नुसार पूर्णपणे एकूण ४८ कर्मचारी, अधिकाऱ्यांची आवश्यकता असताना केवळ २७ पदांची पूर्तता झाली आहे. हॉस्पिटल मधील अधिकारी कर्मचारी सांगतात , रुग्णांची संख्या जास्त, पण आमच्याकडे पुरेसा स्टाफ नाहीये. त्यामुळे रुग्णांची सेवा करत असताना प्रचंड ताण निर्माण होतो, याबाबत वेळोवेळी वरिष्ठांकडे रिक्त पदे भरण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. पण अजूनही काहीच झालं नाही... अर्थात जिल्हा स्त्री रुग्णालयाची यंत्रणा 'व्हेंटिलेटरवर ' असल्याचेच म्हणावे लागेल.
शहरातील धाडनाका रोडवरील जिल्हा स्त्री रुग्णालय महिला रुग्णांसाठी सोयीचे ठरावे या हेतूने दोन वर्षांपूर्वी साकारल्या गेले. प्रशस्त इमारत अत्याधुनिक सोईसुविधांनी उपयुक्त ठरलेले आहे. परंतु कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवा गडबडली आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित होते. अर्थात काही दिवसांपूर्वी एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाल दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.
फक्त ६ कर्मचारी परमनंट!
जिल्हा स्त्री रुग्णालयात वर्तमान स्थितीत ५ प्रसुतितज्ञ कंत्राट पद्धतीवर कार्यरत आहे. त्यापैकी २ रजेवर आहेत. शिवाय सक्षम कंपनीद्वारे कंत्राटी नियुक्त १६ स्टॉफ नर्स कार्यरत आहेत, यासह ६ व्यवस्थापन इन्चार्ज हेच परमनंट स्वरूपाचे आहेत. 
ही आहेत रिक्तपदे...    
 वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी, बालरोग विषयतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, बधीरीकरणतज्ञ, दोन वैद्यकीय अधिकारी, क्ष किरण शास्त्रतज्ञ, दोन वैद्यकीय अधिकारी श्रेणी दोन, प्रशासकीय अधिकारी, कार्यालय अधीक्षक, दोन अधिपरिचारिका, बालरोग परिचारिका, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वस्त्रपाल व वर्णोपचारक.