जिल्ह्यात २९ जुलैपर्यंत पाऊस कोसळणार! जिल्हा कृषी हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ मनीष येदुलवारांनी सांगितला पावसाचा पुढचा प्लॅन;म्हणाले,२७ जुलैला मुसळधार! शेतकऱ्यांना दिला "हा" महत्वाचा सल्ला..
भारतीय हवामान खात्याने आज वर्तवलेल्या ५ दिवशीय हवामान अंदाजाची माहिती येदुलवार यांनी दिली. जिल्ह्यात २५, २८ आणि २९ जुलैपर्यंत बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. २६ आणि २७ जुलैला पावसाची अधिक शक्यता आहे, या दिवशी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २७ जुलैला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ ते २९ जुलै या कालावधीत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेनुसार विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याचे येदुलवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला...
मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलेले असेल अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. कपाशी पिकातील गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनसाठी पीक उगवणीनंतर ३५ ते ४० दिवसांपासून दर १५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग व मका या पिकातील अंतर मशागतीची, फवारणीची व खते देण्याची कामे स्थानिक हवामान परिस्थिती व पुढील पाऊसमान पाहून करावी. विजांचा गडगडाट होत असताना जनावरे व स्वतः सुरुक्षित ठिकाणी ठेवावी असे आवाहन देखील येदुलवार यांनी केले आहे.