BREAKING धनगर समाजाच्या मोर्चाला सुरवात! उपोषणकर्ते नंदू लवंगे यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो समाजबांधव बुलडाण्यात!
शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त!
आरक्षण आमच्या हक्काचं...घोषणांनी तहसील चौक दुमदुमला!
Updated: Feb 12, 2024, 13:17 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ):धनगर आरक्षणासाठी मागील१५ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नंदू लवंगे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी समाजाच्यावतीने आज १२ फेब्रुवारीला धडक मोर्चा काढण्यात येतोय. हजारो समाजबांधव एकत्रित होत आहेत. येथील तहसील चौकातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नियोजित स्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे.
मोर्चाला सुरुवात झाली असून शेकडो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. धनगरसमाजातील चिमुकल्यांकडून सरकार विरोधी घोषणांना सुरुवात झाली आहे. आरक्षण आमच्या हककाच नाही कुणाच्या बापाच या घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला आहे.