नगरपालिकेच्या घंटागाडीने दुचाकीला उडवले; दोघे गंभीर! चिखली शहरातील घटना...

 
चिखली(गणेश धुंदाळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरात आज, २ नोव्हेंबरच्या दुपारी भीषण अपघात झाला. नगरपालिकेच्या घंटागाडीने दुचाकीला उडवले, यात दुचाकीस्वार दोघे गंभीर जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक असून एकाला छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार चिखली ते मेहकर फाट्यादरम्यान असलेल्या शुभम सेल्स समोर हा अपघात झाला. अपघातात जखमी तरुण चिखली तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी आहेत. शुभम परिहार(२३) आणि राहुल भोसले (२३) अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान नगरपरिषदेच्या घंटागाडीचा चालक दारूच्या नशेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र एवढे होऊनही नगरपालिका प्रशासनाकडून जखमींचा साधी विचारपूस देखील झाली नाही. नगरपालिका प्रशासकांनी फोनदेखील उचलला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.