गोमेधरच्या गौतमेश्वर संस्थानमध्ये पार पडले महादेवपार्वतीचे शुभमंगल! महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर होणाऱ्या सोहळ्याला १०५ वर्षांची परंपरा, हजारो शिवभक्तांची हजेरी

 
kgu
जानेफळ (अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील सप्तऋषी पैकी तिसरे ठिकाण असलेल्या गौतमेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर महादेव -  पावर्तीचे शुभमंगल पार पडले. यावेळी गोमेधर गावातुन  टाळ मृदंगाच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली.

jjjj

गोमेधर येथील या सोहळ्याला  अखंडितपणे १०५ वर्षाची परंपरा असून हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली. डोंगराच्या कुशीत असलेल्या गौतमेश्वर संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थान अध्यक्ष विनोदराव होणे यांच्या घरापासून महादेव पार्वतीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येऊन  टाळ मृदंगाच्या तालावर विविध भक्ती गीतामध्ये तल्लीन होऊन पालखी संस्थान वर आज सकाळी अकरा वाजता पोहोचली.

संस्थानवर  पालखी पोहोचल्यानंतर  विधिवत आरती पूजा करण्यात आली . महादेव पार्वतीच्या सभोवताली गहू, तांदूळ, ज्वारी, उडीद तर मुग मसूर तीळ या धान्याची राशी मांडल्या त्यानंतर विवाह सोहळा पार पाडला. आज ,दुपारी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.