BIG BREAKING मराठा क्रांती मोर्चात वातावरण पेटले! जिजामाता प्रेक्षागर मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा एकाचा प्रयत्न

 
Hjvgs
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अतिविराट मराठा क्रांती मोर्चा ला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. जिजामाता प्रेक्षागार मैदानात मोर्चेकरी जमण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता हे आंदोलन पेटण्याची चिन्हे  आहेत. जिजामाता प्रेक्षागर मैदानाच्या छतावरून उडी मारून एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

संभाजी पाटील भाकरे ( नांदुरा) असे छतावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. जिजामाता पेक्षागार मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र वेळीच शिस्थस्वयंसेवकांनी रोखल्याने पुढील अनर्थ टळला.